मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय...
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचंय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचंय,
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर,
छान अक्षरात आपल नाव लिहायचंय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय...
मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन,
नलाखाली हात धरून पानी प्यायचंय,
कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या,
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचंय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय...
उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचंय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनंदासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय...
कितीही जड असु दे...
जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचं ओझ पाठिवर वागवायचंय !
कितीहि उकडत असू दे..
वातानुकूलित ऑफ़िसपेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचंय !
कितीहि तुटका असु दे..
ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघांच्या बाकावर ३ मित्रांनी बसायचंय !
आणि म्हणुनच मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय...!

No comments:
Post a Comment